BOI Recruitment 2020 : बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, परीक्षा नाही फक्त मुलाखत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असे असले तरी सरकारी नोकऱ्यांचा सध्या पाऊस पडत आहे. एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. यामध्ये 42020 एवढा पगार मिळणार आहे. बँक ऑफ इंडियाने या भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामधील अटीनुसार अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.

पदे आणि वेतन
अधिकारी दर्जाच्या 14 जागा असून पगार 23700 ते 42020 रुपये.
क्लार्क दर्जाच्या 14 जागा असून पगार 11765 ते 31540 रुपये एवढा पगार दिला जाणार आहे.

अर्ज कोण करु शकतात
अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांकडे मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही विभागाची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय ए, बी आणि सी कॅटेगरीमध्ये स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे आवश्यक आहे. तर क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्या 10वी पास असणे बंधनकारक आहे. तसेच डी श्रेणीतील स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.

वयाची अट
या भारतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. वयाची मोजणी 01 जुलै 2020 च्या आधारे केली जाणार आहे.

अर्जासाठी शुल्क
या जागांसाठी एससी/एसटी/पीडब्ल्यूडी मधील उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. तर इतर उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. हे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे करता येऊ शकते. या भरतीसाठी उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in वर जाऊन 16 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करु शकता. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख देखील 16 ऑगस्ट 2020 हीच आहे.