Indian Army Recruitment 2020 : भारतीय लष्करात संधी ! इंजिनिअर, वकिलांना वेतन 1.77 ते 2.18 लाख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय इंजिनियरींगच्या कोणत्याही शोखेतून पदवी मिळवणाऱ्यांसाठी (BE/B Tech) भारतीय सैन्यात सेवा देण्याची संधी चालून आली आहे. इंजिनियर पदवीधारकांसाठी शॉर्ट सर्व्हीस कमिशन टेक्निकल कोर्स अंतर्गत जागा निघाल्या आहेत. यात पुरुष आणि महिला या दोन्हीसाठी भरती होणार आहे.

पदांचं नाव

शॉर्ट सर्व्हीस कमिशन (टेक्निकल) 56 पुरुषांसाठी
शॉर्ट सर्व्हीस कमिशन (टेक्निकल) 27 महिलांसाठी

लवकरच घोषित केली जाईल पदांची संख्या

पगार – 56000 रुपये ते 177500 रुपये एवढे पेस्केल देण्यात येणार आहे.
(लेव्हल 10 नुसार) या भरतीसाठी उमेदवारांना जॉईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर म्हणजेच joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची लिंक आजपासून सुरू केली जाणार आहे. तेव्हाच या भरतीबद्दल सर्व माहिती दिली जाणार आहे. अद्याप या वेबसाईटवर याची माहिती अपलोड झालेली नाही. त्यामुळं इच्छुकांना थोड्या वेळानं वेबसाईट पहावी लागणार आहे.

अर्जाची अंतिम तारीख – 12 नोव्हेंबर 2020.

उमेदवाराला कोणतंही अर्ज शुल्क आकारलं जाणार नाही. ही प्रक्रिया निशुल्क आहे.

दरम्यान 13 ऑक्टोबरला कायद्याची पदवी एलएलबी कमीत कमी 55 टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्यांसाठी जागा काढण्यात आल्या आहेत. यात 5 पुरुष आणि 3 महिलांसाठी ही भरती आहे. वयाची अट 21 ते 27 आहे. 14 वर्षे सेवा करावी लागणार आहे. यासाठी पेस्केल 56100 ते 218200 एवढे पदांनुसार दिले जाणार आहे.