खुशखबर ! नववर्षात ‘प्रायव्हेट सेक्टर’मध्ये 7 लाख नोकऱ्या होणार ‘उपलब्ध’, 8% पगार वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षी खाजगी क्षेत्रात जवळवळ सात लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. तसेच या क्षेत्रातील कामगारांच्या पगारामध्ये 8 % वाढ होणार असल्याची आशा वर्तवली जाते. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यानुसार नवीन भरतीबाबत जास्त आशा सर्वांना आहे. रोजगार सल्लागार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले की, वर्ष 2020 मध्ये सुमारे सात लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. नोकरीच्या निर्मितीत स्टार्टअप कंपन्या आघाडीवर योगदान देतील. स्टार्टअप कंपन्यांचा अंदाज आहे की प्रत्येक क्षेत्रात सर्वाधिक रोजगार मिळतील.

या सर्वेक्षणात 42 प्रमुख शहरांतील 12 उद्योग क्षेत्रातील 4,278 कंपन्यांचा समावेश आहे. बंगलोर, मुंबई, दिल्ली-एनसीआर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे यांचा समावेश आहे. यामुळे एकूण 5,14,900 रोजगार निर्माण होतील. उर्वरित रोजगार दुसर्‍या व तृतीय श्रेणी शहरांमध्ये तयार केले जातील.

किरकोळ आणि ई-कॉमर्समध्ये सर्वाधिक रोजगार
सर्वेक्षणात म्हटले आहे की सन 2020 मध्ये किरकोळ व ई-कॉमर्स क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार (1,12,000) उत्पन्न अपेक्षित आहे. यानंतर आयटी सेवांमध्ये 1,05,500 रोजगार, आरोग्य सेवा 98,300, एफएमसीजीत 87,500, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 68,900 आणि बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात 59,700 रोजगार निर्मितीचा अंदाज आहे.

2019 मध्ये 5.9 लाख रोजगार निर्मिती
या सर्वेक्षणानुसार 2019 मध्ये 6.2 लाख रोजगार निर्मिती झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आता या नवीन वर्षी देशाच्या दक्षिणेकडील भागात सर्वाधिक रोजगार निर्मिती होणार आहे. याची संख्या 2,15,400 पर्यंत असेल. तसेच उत्तर भागात 1,95,700, पश्चिमी भागात 1,65,700 आणि पूर्वेकडील भागात 1,25,800 रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/