PNB SO Recruitment 2020 : पंजाब नॅशनल बँकेत 535 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी, भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने विविध विभाग एमएमजीएस-2 आणि एमएमजीएस-3 ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांवर स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2020रोजी आहे. अर्ज करण्यास इच्छुक योग्य उमेदवार पीएनबीच्या ऑफिशियल वेबसाइटवर करियर सेक्शनमध्ये उपलब्ध ऑनलाइन फॉर्मच्या मदतीने अर्ज करू शकतात.

उमेदवार खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे सुद्धा भरतीचे नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकतात आणि पीएनबी स्पेशलिस्ट ऑफिसर ऑनलाइन फॉर्म 2020 च्या पेजवर जाऊ शकतात. पीएनबीद्वारे ऑनलाइन अर्ज प्रकियेंतर्गत अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख सुद्धा 6 ऑक्टोबर आहे.

* नोटिफिकेशनसाठी डायरेक्ट लिंक
https://www.pnbindia.in/Recruitments.aspx

* फॉर्मच्या पेजवर जाण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/pnbsplomay20/

पीएनबीने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी नोटिफिकेशन 7 सप्टेंबर 2020ला आपल्या ऑफिशियल वेबसाइट pnbindia.in वर जारी केली आहे. पीएनबीमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 8 सप्टेंबरला सुरू झाली होती.

असा करा अर्ज
उमेदवारांनी बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जावे. येथे करियर सेक्शनमध्ये जावे, याठिकाणी ऑनलाइन अप्लीकेशन फॉर्मची लिंक उपलब्ध आहे. यावर क्लिक करून उमेदवर आयबीपीएसच्या अ‍ॅप्लीकेशन पोर्टलवर पोहचतील, जेथे उमेदवारांना अगोदर रिजस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर दिलेल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतो.

अर्जाचे शुल्क
एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी वर्गाच्या उमेदवारांसाठी – 175 रुपये
इतर सर्व उमेदवारांसाठी – 800 रुपये