Sarkari Naukri 2020 : केंद्रीय रेशीम बोर्डामध्ये सरकारी नोकरी, 79 पदांसाठी निघाली भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत केंद्रीय रेशीम बोर्डाने (सीएसबी) वैज्ञानिक आणि सहाय्यकांच्या पदांवरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२० निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी २० जुलै २०२० पर्यंत जमा करावी लागेल.

सीएसबीने नुकतीच १३ जून २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार, ऑनलाइन अर्ज न करता अर्जाची हार्ड कॉपी जमा करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज नोटीस न देता रद्द केले जातील.

या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
वैज्ञानिक बी – ५९ पदे
वैज्ञानिक बी सीएसटीआरआय – १५ पदे
वैज्ञानिक सी – ३ पदे
सहाय्यक – २ पदे

जाणून घ्या पात्रतेचे निकष
वैज्ञानिक बी – एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून विज्ञान किंवा कृषी विज्ञान शाखेत पदवी. वय मर्यादा ३५ वर्षे.
वैज्ञानिक बी सीएसटीआय – टेक्सटाईल टेक्नॉलॉजीमध्ये बीई/ बीटेक डिग्री. वयोमर्यादा ३५ वर्षे.
वैज्ञानिक सी – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून विज्ञान किंवा कृषी विज्ञान विषयात पदवी. वयोमर्यादा ४० वर्षे.
सहाय्यक – इंटोमॉलॉजी/ प्राणीशास्त्र/ कृषी/ सीरीकल्चर/ केमिस्ट्रीमध्ये पदवी किमान ५०% गुणांसह. वयोमर्यादा ३० वर्षे.

अशी होईल निवड
वैज्ञानिक पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन/ लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. तर सहाय्यक पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन/ लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.

असा करा अर्ज
केंद्रीय रेशीम बोर्डावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट csb.gov.in वर जावे लागेल. यानंतर होम पेजवर दिलेल्या जॉब अपॉर्च्युनिटीजच्या लिंकवर क्लिक करून करिअर पेजवर जाऊ शकता. तिथे अधिकृत सूचना आणि ऑनलाईन सबमिशनसाठी लिंक देण्यात आली आहे. ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना नवीन पेजवर नवीन नोंदणीसाठीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. तिथे मागितलेली माहिती भरून सबमिट करावी लागेल. नोंदणीनंतर उमेदवार त्यांच्या ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉग इन करुन अर्ज करू शकतात.