Sarkari Naukri 2020 : ‘मायनिंग’ सेक्टरमध्ये सरकारी नोकरी, 136 पदांसाठी होतेय भरती

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – भारत सरकारच्या अणुउर्जा विभागांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (युसीआयएल) ने दोन वेगवेगळ्या भरतीच्या जाहिरात जारी करत 136 मायनिंग मेट आणि अन्य पदांवर नियमित आधारावर आणि 4 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर पदावर संविधेच्या आधारे भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. योग्य पात्रता असणारे इच्छूक उमेदवार या पदांसाठी ऑफिशियल वेबसाईट ucil.gov.in वरून नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकतात. तसेच ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करू शकतात.

युसीआयएलद्वारे जारी भरती जाहिरातीनुसार 136 मायनिंग मेट आणि अन्य पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे 18 मे रोजी सुरू झाले आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2020 आहे. तर 4 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर पदासाठी 10 जून 2020 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो.

या पदांसाठी करा अर्ज

-ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल) – 4 पदे

-मायनिंग मेट-सी – 52 पदे

-बॉयलर-कम-कॉम्प्रेसर अटेंडन्ट -ए – 3 पदे

-वायंडिंग इंजिन ड्रायव्हर -बी – 14 पदे

-ब्लास्टर-बी – 4 पदे

-अप्रेंटीस (मायनिंग मेट) – 53 पदे

-अप्रेंटीस (लॅबोरेटरी असिस्टंट) – 6 पदे

-असिस्टंट सब-इन्स्पेक्टर – 4 पदे

अशी होईल निवड

युसीआयएलमध्ये 136 मायनिंग मेट आणि अन्य पदांसाठी उमेदवारांची निवड कम्प्यूटर बेस्ड ऑनलाईन परिक्षेद्वारे होईल. ऑनलाईन परीक्षा दोन तासाची असेल. यामध्ये जनरल नॉलेज/अवेयरनेस, रिजनिंग, न्युमेरिकल अ‍ॅबिलिटी, जनरल इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेज (पदानुसार) विषयाशी संबंधीत एकुण 120 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे. चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही निगेटीव्ह मार्किंग नाही. ऑनलाईन परीक्षेत प्रश्न, इंग्रजीचे प्रश्न सोडून, इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत असतील.