Sarkari Naukri : राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 पदांसाठी अर्ज करण्याची तारीख पुन्हा वाढली, 30 वर्षापर्यंतच्या तरूणांना करता येणार अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी राष्ट्रीय बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएससीएल) ने विविध विभागांमधील मॅनेजमेंट ट्रेनी आणि अन्य २२० पदांच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात (क्रमांक RECTT/1/20/NSC/2020) जाहीर केली होती. एनएससीएलच्या या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आता ३१ ऑगस्ट २०२ पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्जाची अंतिम मुदत १९ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आली होती आणि अधिसूचना दिल्यावर शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०२० ठरवली गेली होती.

भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएससीएल) मध्ये सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या कोणत्याही कारणास्तव अर्ज करण्यास वंचित राहिलेले जे उमेदवार होते, ते एनएससीएलच्या अधिकृत संकेतस्थळ indiaseeds.com वर किंवा सरळ ऍप्लिकेशन ऑनलाईन पोर्टल applyonline.co.in/nsc वर ऑनलाईन अर्ज करु शकतात.

या पदांसाठी करू शकता अर्ज
एनएससीएल भरती २०२० अंतर्गत सहाय्यक (कायदेशीर) ग्रेड १, विविध विभागात मॅनेजमेंट ट्रेनी, सिनियर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी आणि ट्रेनी मेट या पदांसाठी एकूण २२० जागा रिक्त आहेत.

निर्धारित पात्रता निकष
एनएससीएल भरती २०२० मध्ये जाहिरातीमधील पदांसाठी निश्चित केलेल्या पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. उमेदवारांनी संबंधित विभाग किंवा ट्रेडमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच काही पदांसाठी पूर्वीचा अनुभवही मागितला गेला आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा. तसेच ४ ऑगस्ट २०२० रोजी उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र सहाय्यक पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आणि ट्रेनी मेट पदांसाठी २५ वर्षे निश्चित केले आहे.