SBI SCO Recruitment 2020 : स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 92 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) विविध तज्ज्ञ कॅडर अधिकाऱ्यांच्या 92 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करुन ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 18 सप्टेंबर 2020 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट, sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, असिस्टंट जनरल मॅनेजर या पदे भरती करावयाची आहेत. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात आणि अधिसूचना पाहू शकतात.

रिक्त स्थान तपशील

डेप्युटी मॅनेजर (सुरक्षा) (बॅकलॉग): 11 पोस्ट.

डेप्युटी मॅनेजर (सुरक्षा) (चालू): 17 पोस्ट.

मॅनेजर, (रिटेल प्रोडक्ट्स): 5 पोस्ट

डेटा ट्रेनर: 1 पोस्ट

डेटा ट्रान्सलेटर: 1 पोस्ट

सीनिअर कंसल्टेंट एनालिस्ट: 1 पोस्ट

असिस्टंट जनरल मॅनेजर : 1 पोस्ट

दोन वर्षे पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप: 5 पोस्ट

डेटा प्रोटेक्शन ऑफिसर: 1 पोस्ट

डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट): 11 पोस्ट

मॅनेजर (डेटा सायंटिस्ट): 11 पोस्ट

डेप्युटी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर) 5 पोस्ट

रिस्क स्पेशलिस्ट – सेक्टर (स्केल- III) : 5 पोस्ट

रिस्क स्पेशलिस्ट – सेक्टर (स्केल- II) : 5 पोस्ट

पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशलिस्ट (स्केल- II) : 3 पोस्ट

रिस्क स्पेशलिस्ट – क्रेडिट (स्केल- III) : 2 पोस्ट

रिस्क स्पेशलिस्ट – क्रेडिट (स्केल- II) – 2 पोस्ट

रिस्क स्पेशलिस्ट – एंटरप्राइज (स्केल- II) : 1 पोस्ट

रिस्क स्पेशलिस्ट – IND AS (स्केल- III) : 4 पोस्ट

शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा

डेटा मॅनेजर ऑफ डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी, बॅकलॉग) या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. इतर पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता निर्धारित केल्या आहेत. उमेदवार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादासह इतर तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना तपासू शकतात.