Jobs | नोकरी शोधणार्‍या तरूणांसाठी खुशखबर ! तिसर्‍या तिमाहीत 44 % नवीन नियुक्त्या करतील कंपन्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jobs | एका सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की पुढील तीन महिन्यात कंपन्या 44 टक्के नवीन नियुक्त्या करण्याची तयारी करत आहेत. मॅन पावर ग्रुप इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या रोजगार (Jobs) सर्वेक्षणानुसार ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीदरम्यान शुद्ध रोजगार दृश्यता 44 टक्के आहे. हा मागील सात वर्षातील सर्वात चांगला दृष्टीकोन आहे.

शुद्ध रोजगार दृश्यता ही नियुक्ती हालचालींमध्ये घट होण्याची शंका व्यक्त करणार्‍या कंपन्याच्या टक्क्यांमधून नियुक्ती हालचालीत वाढीची शक्यता व्यक्त करणार्‍या कंपन्यांची टक्केवारी वजा करून काढली जाते. या सर्वेक्षणात 3,046 कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता.

सर्वेतून संकेत मिळतो की, अनेक कंपन्या यावर्षाच्या अखेरपासून अगोदर आपल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याबाबत विचार करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महामारी संबंधीत प्रतिबंध शिथिलता आणल्यानंतर उत्पादन आणि सेवांची मागणी वाढली आहे.

मॅन पावर ग्रुप इंडियाचे समूह व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांनी म्हटले, कॉर्पोरेट भारतात पुन्हा मजबूतीचा कल दिसत आहे. बाजारात एकुण धारणा सकारात्मक आहे. नवीन परिस्थितीत भूराजकिय स्थिरता, विविधतेची अर्थव्यवस्था, लोकसंख्याशासत्र महत्वाची भूमिका पार पाडत आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर सर्व क्षेत्रांमध्ये नियुक्तीच्या शक्यतांमध्ये सुधारणा झाली आहे.

सेवा, उत्पादन आणि अर्थ, विमा तसेच रियल इस्टेट क्षेत्रात दृश्य सर्वात चांगले आहे.
त्यांनी म्हटले, लसीकरणात तेजी आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये दुसर्‍या डोसची तयारी आहे,
सणांचा हंगामसुद्धा समोर आहे, यामुळे आशा वाढत आहे.

मात्र, तिसर्‍या लाटेचा धोका आणि कुशल कामगारांची कमतरता उद्योगांसमोर आहे.
सर्वेक्षणात हे सुद्धा समोर आले आहे की, सर्व चार क्षेत्रांमध्ये नियुक्तीची शक्यतांमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत खुप मजबूती आली आहे.

Web Titel :- Jobs | companies will make 44 new appointments in the third quarter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gopichand Padalkar | ‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – गोपीचंद पडळकर (व्हिडिओ)

OMG ! ‘सिक्स पॅक’ बनवता-बनवता झालं असं काही की 18 वर्षाच्या तरूणाचं ’प्रेग्नंसी बंप’ प्रमाणे आलं पोट, जाणून घ्या प्रकरण

Mumbai Crime | टूथपेस्ट समजूर रॅट किलरने स्वच्छ केले दात, अखेर मुलीचा झाला मृत्यू