राज्यात डॉक्टर, नर्सच्या 305 जागांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नोकरीची उत्तम संधी आहे. भारत सरकार तुम्हाला ही नोकरीची संधी देत आहे. नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३०५ जागांवर भरती करण्यात येणार असून सुपर स्पेशॅलिस्ट, स्पेशॅलिस्ट, प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर, काॅन्सिलर त्याचबरोबर स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर, ज्युनियर इंजिनियरिंग अशा पदांसाठी जागा भरणं आहे.

वयाची अट
या जागांसाठी नर्स आणि टेक्निशिअनचे वय हे ६५ वर्षांच्या आत असावे. तर एमबीबीएस या पदासाठी ७० वर्षांपर्यंत वय असावे. त्याचबरोबर इतर पदांसाठी देखील विशिष्ट वयोमर्यादा असून ३८ वर्षांच्या आतील व्यक्ती आणि उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील.

अर्ज फी
या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गासाठी १५० रुपये फी असून आरक्षित वर्गाला १०० रुपये फी आहे.

नोकरी ठिकाण
या पदासाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला नाशिक येथे काम करावे लागेल.

मुलाखत ठिकाण
हाॅस्पिटल ट्रेनिंग सेंटर, जिल्हा रुग्णालय आवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर, नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ८ ऑगस्ट आहे.

अधिक माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in इथे क्लिक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणाऱ्या या पदांबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देखील क्लार्क आणि शिपाई पदासाठी भरती सुरु आहे.

पद संख्या
क्लार्क – १२८
शिपाई – ७६

शैक्षणिक पात्रता

क्लार्क- पदवीधर आणि इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे. त्याचबरोबर MS-CIT सर्टिफिकेट

या पदांसाठी वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्षांपर्यंत हवे.

अर्ज फी
क्लार्क या पदासाठी १० रुपये तर शिपाई या पदासाठी ५० रुपये अर्ज फी आहे.

अर्ज करण्याची तारीख
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०१९ आहे.

आरोग्यविषयक वृत्त –