खुशखबर ! IBPS कडून ग्रामीण बॅंक मॅनेजर, ऑफिस असिस्टंटच्या ७४०१ पदांची मेगाभरती ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, ४ जुलै ही अंतिम तारीख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस असिस्टंट पदाची बंपर भरती काढली आहे. ७४०१ पदांसाठी ही भरती होणार आहे. पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १८ जुनला सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०१९ असेल. उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेऊन केली जाईल .

पदांचे नाव

ऑफिसर (स्केल I, II & III) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपरपज)

महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्जप्रक्रियेची सुरवात ता – १८ जून २०१९
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ४ जुलै २०१९
उशिरा अर्ज केल्यास दंडासहित – ४ जुलै २०१९

पात्रता

अर्जावरील माहितीप्रमाणे कोणत्याही शाखेचा पदवीधर जसे की B.E./B.Tech, LLB, CA, MBA .

वयाची अट

वेग वेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या वयाची अट असेल. कमीतकमी वय १८ वर्ष आणि जास्तीजास्त वय ४० वर्ष असेल.

अर्जाची फी

जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस साठी – ६०० रुपये

एससी, एसटी, पीडब्ल्यूडी साठी – १०० रुपये

IBPS RRB साठी असा करा अर्ज

इच्छुक विद्यार्थी http://www.ibps.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात.

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

 

You might also like