भारतीय नौदलात काम करण्याची संधी, पगार 69100, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय नौदलामध्ये काम करण्याची संधी आहे. नैदलात ग्रुप सी, नॉन गॅजेटेड पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. ग्रुप सीमध्ये ज्या पदासाठी भरती होणार आहे. त्यामध्ये सफाई कामगार, पेस्ट कंट्रोल कामगार, कुक आणि फायर इंजिन ड्रायव्हर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी सॅलरी पॅकेज 18 हजारापासून 69 हजार 100 रुपयापर्यंत आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 दरम्यान असणे आवश्यक आहे.

कुठल्या पदासाठी किती जागा ?
कुक –
1 पद
पेस्ट कंट्रोल कामगार – 2 पदं
सफाई कामगार – 9 पदं
फायर इंजिन ड्रायव्हर – 1 पद

शैक्षणिक पात्रता
सफाई कामगार या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाचा दहावीचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पेस्ट कंट्रोल कामगारासाठी देखील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याला हिंदी किंवा स्थानिक भाषा बोलता आली पाहिजे.

फायर इंजिन ड्रायव्हरसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण पाहिजे. जड वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच वाहन परवाना गरजेचा आहे.

वेतन
सफाई कामगाराचा पगार 18 हजार 500 रुपयापर्यंत असेल. तर पेस्ट कंट्रोल कामगाराचा पगार 18 हजार ते 59 हजार 900 रुपयापर्यंत असेल. कुकचा पगार 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये असेल.

अधिक माहितीसाठी www.indiannavy.nic.in इथे संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like