जोधपुरमधून HM अमित शहांनी विरोधी पक्षाला दिलं ‘आव्हान’, CAA वर 1 इंच देखील पाठीमागे हटणार नाही, भाषणातील 8 महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जोधपूरमध्ये नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ मोर्चाला संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सरकार या विषयावर एक इंचही मागे हटणार नाही. कॉंग्रेस पक्षाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात गैरसमज केले आहेत. विरोधी पक्ष देशाची दिशाभूल करीत आहे, परंतु संपूर्ण विरोधी पक्ष एकत्रित असला तरीही सरकार सीएएवर एक इंचही मागे हटणार नाही. शहा येथे भारतीय जनता पक्षाच्या जनजागृती मोहिमेतील जाहीर सभेला संबोधित करत होते.

केंद्रीय गृहराज्यमंत्री शाह यांनी मारवाडच्या वीर भूमीला नमन करून आपल्या अभिभाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ देशात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. व्होटबँकचे राजकारण करणारेच निषेध करीत आहेत. आम्ही देशातील लोकांसमोर आपली बाजू मांडत आहोत. मी सर्व विरोधी पक्षांना आव्हान देतो, जर तुम्ही कायदा वाचला असेल तर कुठेही चर्चा करायला या, कायद्यात कोठेही कोणाचेही नागरिकत्व घेण्याची तरतूद नाही, विरोधी पक्ष दिशाभूल करीत आहेत. शहा म्हणाले की, हा कायदा कुणाचेही नागरिकत्व घेण्यासाठी नाही, अत्याचार केलेल्या शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आहे.

अमित शहा यांच्या भाषणातील वैशिष्ट्य :
-धर्माच्या आधारे देशाचे विभाजन होऊ नये, कॉंग्रेस पक्षाने धर्माच्या आधारे विभाजन केले. पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, छळाचा बळी पडलेल्या निर्वासितांची कोणालाही चिंता नाही.

– 56-इंच छाती असणाऱ्या माणसाने धैर्य दाखविले, निर्वासितांच्या मानवी हक्कांची चिंता केली. मी तुम्हाला शाश्वती देऊन सांगतो कि, भारतात आलेल्या निर्वासितांसाठी भारत आपला आहे.

– मोदी सरकार व्होट बँकचे राजकारण करीत नाही, भारत अल्पसंख्यांकांचा मोठ्या मनाने आदर करतो, अफगाणिस्तानात फक्त 500 अल्पसंख्याक शिल्लक आहेत.

-कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांनचे पालन केले नाही, परंतु आम्ही करू.

– हा कायदा लागू झाल्यानंतर दंगली करण्यात आल्या, मला निषेध करणार्‍यांना सांगायचे आहे, लोकांना दिशाभूल करणे सोपे नाही.

– भाजप देशव्यापी जनजागृती सुरू करीत आहे, 500 सभा कर कायद्याबद्दल सांगतील.

– कॉंग्रेसला राष्ट्रीयतितच्या मुद्द्यांचा विरोध करण्याची सवय लागली, तिहेरी तलाक, कलम 370, राम मंदिर, हवाई हल्ल्याचा विरोध, व्होट बँकेसाठी वीर सावरकरांचा अपमान.

-ज्यांनी देशाचे तुकडे तुकडे केले त्यांना तुरूंगात टाकले पाहिजे, तुकडे करणारी टोळी देशाचा विभाजन करू इच्छित आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/