काय सांगता ! एअर होस्टेसनं चक्क सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या ‘या’ गँगस्टरशी केलं लग्न !

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर विक्रमजीत सिंहचा विवाह त्याच्या प्रेयसीशी आर्य समाज भवनात पार पडला. जोधपूर कोर्टाने गँगस्टर विक्रमजीतला त्याची एअर होस्टेस गर्लफ्रेंड गुरजित कौरशी लग्न करण्याची परवानगी दिली. कडक सुरक्षा बंदोबस्तात पोलिसांनी विक्रमजीत सिंह याला आर्य समाज येथे विवाहस्थळी नेले. जोधपूरच्या ट्रॅव्हल व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी विक्रमजीत हा कैदी आहे.

विवाहासाठी गँगस्टरने वकिलामार्फत कोर्टात अर्ज दाखल केला होता. अर्जामध्ये म्हटलं होत की , विक्रमजीत सिंह आणि एअर होस्टेस गुरजित कौर दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि दोघांनाही हिंदू रूढीनुसार लग्न करायचं आहे. या विशिष्ट प्रकरणात कोर्टाने नरमाईचे धोरण अवलंबत पोलिस कोठडीत शिक्षा भोगत असताना विक्रमजीतला लग्न करण्याची परवानगी दिली.

गँगस्टर विक्रमजीत सिंहची मैत्रीण हरियाणा एअरलाइन्सची एअर होस्टेस आहे. कोर्टाच्या परवानगीने दोघांनी पाबूपुरा येथील आर्य समाज भवनात मोठ्या पोलीस बंदोबस्तात रविवारी दुपारी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दोघांना वैवाहिक प्रमाणपत्र देण्यात आले. विवाह विधी पार पडल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी विक्रमजित सिंह यांना पुन्हा मध्यवर्ती कारागृहात नेले. तर त्याची पत्नी गुरजित कौर आपल्या नातेवाईकांसह गेली.

जोधपूरचे डॉक्टर सुनील चांडक आणि ट्रॅव्हल व्यावसायिक मनीष जैन यांच्या शास्त्री नगर येथील निवासस्थानावर फायरिंग करणे आणि दहशत निर्माण करण्याच्या आरोपाखाली आरोपी विक्रमजीत व इतरांविरूद्ध न्यायालयात खटला सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like