‘भाईजान’ सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरणाच्या शिकारीच्या प्रकरणात न्यायालयाच्या सुनावणीचा सामना करणाऱ्या अभिनेता सलमान खान याला सोशल मिडिया वेबसाईटवरील फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी गैरी शूटर नावाच्या एका अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. सोपू नावाच्या ग्रुपवर ही पोस्ट हिंदीतून टाकण्यात आली आहे. त्यात सलमान खान याला इशारा देण्यात आला आहे. तो भारतातील कायद्यापासून स्वत: ला वाचवू शकेल, पण बिश्नोई समाजाच्या कायद्यापासून नाही. असे त्यात म्हटले आहे.

या पोस्टमध्ये ‘‘सोच ले सलमान तू भारत के कानून से बच सकता है लेकिन बिश्नोई समाज और सोपू पार्टी के कानून ने तुझे मौत की सजा सुना दी है. सोपू अदालत में तू दोषी है.’’

जोधपूर पूर्व चे पोलीस उपायुक्त धमेंद्र यादव यांनी याबाबत सांगितले की, या प्रकरणाचा आम्ही शोध घेऊ़ आमच्याकडे सोशल मिडिया सेल आहे. जर आम्हाला काही इनपूट मिळाले तर आम्ही या धमकीबाबत सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करु.

सलमान खान याने १९९८ साली काळ्या हरणाची अवैध शिकार केली होती. याप्रकरणी तो शुक्रवारी जोधपूरच्या न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही २०१८ मध्ये जोधपूर न्यायालयात लॉरेस बिश्नाई नावाच्या एका गँगस्टरने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Visit : policenama.com