ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून जाणं हे जो बायडन यांचं गेल्या 50 वर्षांपासूनचं स्वप्न होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली होती. आणि ते दोघेही विजयी झाले. अमेरिकन अध्यक्ष पदाच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारे डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन लवकरच भारतीयांना आता एक चांगली बातमी देणार आहेत. अध्यक्ष पदाच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करणाऱ्या बायडन यांनी निवडणूक प्रचारात विद्यमान सरकारच्या इमिग्रेशन धोरणावर कडाडून टीका केली होती.

जो बायडन यांनी आता अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी इमिग्रेशन विधेयक मांडण्याची योजना आखत आहेत. नव्या विधेयकामुळे देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १ कोटी १० लाख लोकांना आठ वर्षांसाठी नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या १ कोटी १० लाखांमध्ये जवळपास ५ लाख भारतीयांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं इमिग्रेशन धोरण अतिशय कठोर होतं. परंतु जो बायडन यांचं धोरण त्याच्या अगदी विरुद्ध आहे. बायडन हे बुधवारी अध्यक्ष पदाची शपथ घेतील आणि त्यानंतर लगेचच विधेयक मांडतील, अशी माहिती समोर येत आहे. परंतु ह्या माहितीबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली असल्याचे समजते.

डोनाल्ड ट्रम्प यांचं इमिग्रेशन धोरण अमेरिकेच्या मुल्ल्यांवर कठोर हल्ला करणारं असून सत्तेत येताच या नुकसानाची भरपाई करू, असं आश्वासन बायडन यांनी प्रचारादरम्यान दिलं होतं. पण नव्या विधेयकामुळे १ जानेवारी २०२१ पर्यंत अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल. ते कर भरत असल्यास आणि इतर आवश्यक निकषांची पूर्तता करत असल्यास त्यांना पाच वर्षांसाठी अस्थायी कायदेशीर दर्जा देण्याचा मार्ग प्रशस्त होईल किंवा त्यांना ग्रीन कार्ड मिळेल. तसेच अनेक मुस्लिम देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. मात्र तोदेखील बायडन यांच्याकडून बदलला जाण्याची शक्यता आहे.अशी माहिती समोर येत आहे. अमेरिकेतल्या १.१ कोटी अवैध प्रवाशांना वैध दर्जा देऊ, असं आश्वासन बायडन यांनी दिलं होतं. अमेरिकेतल्या अवैध भारतीय प्रवाशांची संख्या सध्या ५ लाख इतकी आहे.