Lady Gaga Sang US Anthem : जो बायडन यांच्या शपथग्रहण सोहळ्यात ‘लेडी गागा’नं गायलं राष्ट्रगीत ! लुकचीही झाली चर्चा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बुधवारी (दि 20 जानेवारी 2020) अमेरिकेला जो बायडन यांच्या रूपानं 46 वे राष्ट्रपती मिळाले. त्यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यात अनेक दिग्गजांची उपस्थिती होती ज्यांनी आपल्या सादरीकरणानं लोकांचं मन जिंकलं.

या लिस्टमध्ये सिंगर लेडी गागा हिचं नावंही साहजिक आहे. लेडी गागानं आपल्या अनोख्या अंदाजात असा परफॉर्मंस दिला की, ती चर्चेत राहिली.

लेडी गागानं बायडन यांच्या शपथग्रहण सोहळ्यात अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं. जेव्हा ती तिच्या बुलंद आवाजात राष्ट्रगीत गात होती तेव्हा सर्व तिला पहातच होते. तिचा यावेळचा व्हिडीओ देखील समोर आला आहे जो तुफान व्हायरल झाला आहे.

या सोहळ्यात गागाच्या गाण्याव्यतिरीक्त तिच्या लुकचीही खूप चर्चा झाली. गागानं Schiaparelli Haute Couture स्टाईलचा खास गाऊन परिधान केला होता. सोबत तिनं लाल रंगाचा स्कर्टही घातला होता. गागाचे काही फोटोही समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

तिच्या आउटफिटमध्ये तिनं कबूतराचा बॅचही घातला होता. याचीही खूप चर्चा होताना दिसली. लेडी गागानुसार हे शांतीचं एक प्रतिक आहे. एकूणच तिचा लुक खूप ॲक्ट्रॅक्टीव आणि अटेंशन घेणारा होता. तिचं यासाठीही खूप कौतुक होताना दिसलं.