पोलीसनामा ऑनलाईन : क्रीडाविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवरून हि घोषणा केली आहे. 2007 चा टी-20 वर्ल्ड कप भारताला जिंकून देण्यात जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) याने मोलाची भूमिका बजावली होती.
भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये पहिला वहिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारताने 5 बाद 157 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 152 धावांत तंबूत परतला होता. पाकिस्तानने चांगला खेळ करत शेवटच्या षटकापर्यंत रंगत आणली होती. पाकिस्तानला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. यावेळी धोनीने अत्यंत धाडसी निर्णय घेत जोगिंदर शर्माच्या हातात सोपवला अन् पठ्ठ्याने चतुराईने मिसबाह उल हकची विकेट घेत भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला आणि भारताने हा वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. या वर्ल्डकपमध्ये जोगिंदर शर्माने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.
Announced retirement from cricket Thanks to each and everyone for your love and support 🙏❤️👍👍 pic.twitter.com/A2G9JJd515
— Joginder Sharma 🇮🇳 (@MJoginderSharma) February 3, 2023
जोगिंदर शर्माची कारकीर्द
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्या फायनलनंतर जोगिंदर (Joginder Sharma) भारताकडून एकही ट्वेंटी-20 सामना खेळला नाही. 24 जानेवार 2007 मध्ये तो भारताकडून शेवटची वन डे खेळला होता. त्याने 4 वन डे सामन्यांत 35 धावा केल्या व 1 विकेट घेतली. तर 4 ट्वेंटी-20 त 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची क्रिकेटमधील कारकीर्द छोटी असली तरी त्याने क्रिकेट रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जोगींदरनं हरयाणा पोलीस जॉईन केले आणि त्या ठिकाणी तो पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे.
Web Title :- Joginder Sharma | indian cricketer jogindar sharma announce retirement from all formats in cricket
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Jalna Crime News | नशेच्या भरात पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; जालन्यामधील घटना