कारण जोहर आणि ‘तो’ रिलेशनशिपमध्ये ?

मुंबई : वृत्तसंस्था

प्रसिद्ध बॉलिवूड  दिग्दर्शक कारण जोहर आणि फॅशन डिझायनर, अँकर मनीष मल्होत्रा यांच्या मैत्रीची चर्चा तर जगजाहीर आहे. बॉलीवूडमध्ये देखील बऱ्याच पारितोषिक वितरण समारंभात हे दोघे एकत्र अँकरिंग करताना दिसतात. पण त्यांच्या जिगरी दोस्तीची जरी चर्चा सर्वत्र होत असली तरी आपल्या खासगी बोलणे मात्र टाळले आहे. करण आणि मनिष रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. याचे कारण म्हणजे खुद्द मनीष मल्होत्राने दिलेले संकेत. मनिष आणि करण जोहर एकमेकांना डेट करत असल्याचा रिपोर्ट ‘पिंकव्हिला’ या बॉलिवूड वेबसाईटवर पाहायला मिळत आहे.

सध्या मनीष आणि कारण जोहर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कारण जोहरच्या वाढदिवसानिमित्त मनीषने इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर केले होते. यावेळी त्याने ‘हॅपी हॅपी बर्थडे माझ्या प्रिय जीवलग मित्रा. येणारं वर्ष उत्तम जावो. मैत्रीची आणि एकत्र काम करण्याची 25 वर्ष… आणि अजून येणारा दीर्घकाळ आपण एकत्र असूच. तू उत्तमोत्तम चित्रपट तयार करत राहोस. आणि असाच चैतन्यमय राहा.’ असं कॅप्शन मनीष मल्होत्राने दिलं आहे.