‘या’ अभिनेत्यासोबत ब्रेकअपनंतर मानसिक धक्क्यात होती बिपाशा, सोडले होते सिनेमे आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे अनेक अफअर आहेत जे सफल झाले आहेत. काही असेही आहेत जे जास्त दिवस तग धरू शकले नाहीत आणि पुढे जाऊन तुटले. असेच एक अफेअर होते अभिनेता जॉन अब्राहम आणि बिपाशा बसुचं. जॉन त्याच्या लग्नापेक्षा कमी आणि बिपाशा सोबतच्या ब्रेकअपमुळे जास्त चर्चेत आला होता. बिपाशा आणि जॉनच्या करिअरला सोबतच सुरुवात झाली होती. दोघांनी अनेक हिट सिनेमात सोबत काम केले आहे.

एक वेळ अशी होती दोघे लवकरच लग्न करणार आहे अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरु होती. परंतु अचानक दोघांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली. असे म्हटले जात आहे की, जॉनच्या एका ट्विटमुळे दोघांच्या ब्रेकअपचा खुलासा झाला होता. 2014 साली न्यू इयरच्या शुभेच्छा देताना जॉनने ट्विट करत म्हटले होते की, “नवीन वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा, लव जॉन आणि प्रिया.” जॉनच्या ट्वीटमधील चुकीमुळेच बिपाशाला त्या दोघांच्या नात्याबद्दल कळालं होतं. एका मुलाखतीत बिपाशाने आपल्या ब्रेकअपबद्दल बोलताना सांगितले होते की, “माझ्यासाठी या ब्रेकअपमधून बाहेर येणं फारच अवघड होतं. मला अचानक कळालं की, मी ज्याच्यासोबत आहे तो आधीच कोणासोबत तरी नात्यात आहे. मी माझ्या नात्याला वेळ देण्यासाठी सोशल लाईफच संपवली. सिनेमे सोडले. हे सगळं एखाद्या सेटबॅकपेक्षा कमी नव्हतं.”

तुम्हाला सांगू इच्छितो की, जॉनने प्रिया रुंचालसोबत लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाना आज पाच वर्ष झाले आहेत. जॉनने प्रियासोबत सिक्रेट मॅरेज केलं होतं. याची माहिती इंडस्ट्रीतील काही मोजक्याच लोकांना होती. आपल्या ब्रेकअपनंतरच जॉनने प्रियासोबत लग्न केलं होतं. जॉन आणि प्रियाची भेट 2013 मध्ये बांद्र्यातील एका जीममध्ये झाली होती. रिपोर्ट्सनुसार, प्रियाला लाईमलाईटपासून दूर राहायला आवडते. अनेक मुलाखतीत जॉन म्हणाला आहे की, “प्रिया खूपच प्रायव्हेट पर्सन आहे. तिची ही गोष्ट मला खूप आवडते.”