जॉनच्या बहुप्रतीक्षित ‘परमाणू’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई :वृत्तसंस्था
असंख्य तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता जॉन अब्राहम आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भारतीय लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या ‘परमाणू’ या चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा एकदा चर्चेत आला.

या चित्रपटात १९९८ मध्ये झालेल्या भारतातील अणुचाचणीवर आधारित पटकथा आहे. अभिषेक शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याप्रसंगी जॉन म्हणाला,”हा चित्रपट भारताविषयी आहे. पाकिस्तान विरोधी नाही. हा चित्रपट केवळ भारताविषयी आहे. भारतात १९१९८ मध्ये घडलेली घटना जशीच्या तशी उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटात जॉन सोबत डायना पेंटी ही अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे. जॉनच्या चाहत्यांना ‘परमाणू’ची प्रतीक्षा २५ मे पर्यंत करावी लागणार आहे. हा चित्रपट ज्या कथेवर आधारित आहे त्या ‘पोखरण’ चाचणीला शुक्रवारी वीस वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्ताने चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा चर्चेत आला.