दीप-वीरच्या लग्नाचे भन्नाट मीम्स व्हायरल… तुम्ही पाहिलेत का ?

वृत्तसंस्था | रणवीर आणि दीपिकाने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो टाकले. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नातील फोटो गुरुवारी समोर आले. त्यांनी सोशल मीडियावर फोटो टाकताच हे क्षणार्धात व्हायरल झाले. दीप-वीरने लग्नात कोणता पोशाख परिधान केला याची उत्सुकता सर्वांनाच होती. विशेष म्हणजे लग्नात वधूच्या पोशाखाकडे सर्वांचं लक्ष असतं. पण अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरच्या पोशाखाकडे यावेळी अनेकांचं लक्ष होतं. याचमुळे लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्याचे गमतीशीर मीम्स व्हायरल होणं साहजिक होतं. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम सगळीकडेच या फोटोंची चर्चा होती.

नेहमीच्या सूट आणि फॉर्मल कपड्यांना बाजूला सारत त्याचं चौकटीबाहेरचं फॅशन स्टेटमेंट बऱ्याच कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळालं. म्हणूनच नेटकऱ्यांनी त्याच्या फॅशनवरून भन्नाट मीम्स पोस्ट केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल हे नक्की. त्याच्या कपड्यांपासून ते माध्यमांच्या प्रश्नांना सराइतपणे उत्तरं देण्याच्या अनोख्या अंदाजामुळे तो नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे.

‘दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही’ : बाॅलिवूडच्या बड्या अभिनेत्याची प्रतिक्रिया 

रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला : रामलीला’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. ‘गोलियों की रासलीला – रामलीला’, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. सुरुवातीला दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधांविषयी बोलणं टाळलं होतं, तरीही चाहत्यांनी दोघांच्या लग्नाची अटकळ बांधली होतीच. मात्र 21 ऑक्टोबरला थेट लग्नाची पत्रिका शेअर करत रणवीर-दीपिकाने चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, दीपिका -रणवीरने इटलीमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं असून लवकरच ही जोडी मुंबईमध्ये परतणार आहे. जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण देण्यात आलं आहे.