जॉन सीनाने शिल्पा शेट्टीचा शेअर केला ‘टकला’ फोटो, शिल्पाची ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा मुलगा वियान राज कुंद्रा हे एका व्हिडिओमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. व्हिडिओमध्ये वियानने आपल्या फेवरेट रेसलेरबद्दल बोलला होता. व्हिडिओमध्ये रेसलर जॉन सीनाने वियानला स्पेशल मेसेज पाठविला होता. नुकतेच जॉन सीनाने शिल्पा शेट्टीचा एक असा फोटो शेअर केला आहे ज्याला पाहून शिल्पा शेट्टी देखील आश्चर्यचकित झाली आहे.

जॉन सीनाने शिल्पाचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये जॉनच्या चेहऱ्यावर शिल्पाचा चेहरा लावला आहे. फोटो शेअर करुन जॉनने लिहले की, Now even “I Can’t see me” @johncena 😅😂🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤣.शिल्पा शेट्टीने ही इन्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. फोटो शेअर करुन तिने लिहले की, ‘This is hilarious… I certainly “Didn’t SEE” this coming, @johncena.#WWE #wweindia #Stonecold #Johncena #fun #laughs.

सोशल मिडियावर अनेक लोक असे वाटत आहे की, जॉन सीनाचे अकाउंट हॅक झाले आहे. काही लोकांनी या फोटोला पसंत केले आहे. शिल्पाबद्दल बोलायचे म्हणले तर शिल्पा बॉलिवूडमध्ये परतण्याच्या मार्गावर आहे. मिळालेल्या माहितीनूसार, शिल्पाची चित्रपट मेकर्ससोबत चर्चा चालू आहे. जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरल्या तर शिल्पा ११ वर्षानंतर चित्रपटात वापसी करणार आहे.

काही प्रोजेक्टसाठी शिल्पाने थोडा वेळ मागितला आहे. शिल्पा २ प्रोजेक्टसोबत कमबॅक करणार आहे. सध्या फक्त प्रोजेक्टबद्दल माहिती समोर आली आहे.

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’