McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन – अँटीव्हायरस गुरु आणि McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफी (John McAfee) यांनी स्पेनच्या तुरुंगात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅकॅफी 9 महिने तुरुंगात राहिल्याने ते निराश झाले होते. यातूनच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती त्याचे वकील झेव्हीयर विलालबास यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. स्पेनमधील हायकोर्टाने (High Court of Spain) नुकतीच मॅकॅफी यांच्या अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याला मंजुरी दिली होती. दरम्यान तुरुंग प्रशासन मॅकॅफी (John McAfee) यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.

जॉन मॅकॅफी यांनी NASA, Xerox आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या कंपन्यांसाठी काम केले होते. 1987 मध्ये त्यांनी जगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस बनवले होते. जॉन यांनी 2011 मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती. तेंव्हापासून ते या व्यवसायात नव्हते. मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आताही त्यांच्याच नावाने सुरु आहे. जगभरात सुमारे 50 कोटी यूजर या अँटी व्हायरसचा वापर करतात. त्यांच्यावर करचोरीचा आरोप करण्यात आला होता. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर क्रिप्टोकरंसी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावर ऑक्टोबर 2020 मध्ये अटक झाली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : john mcafee dies hanging spanish prison

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक