काय सांगता ! होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला पडलं महागात (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या लॉकडाउनच्या दिवसांत विनाकारण घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आई ओरडताच जॉनी पुन्हा एकदा घरात जाऊन बसले आहे. जॉनी लिव्हर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन हा संपूर्ण किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

घरात बसून बसून मी कंटाळलो आहे. किती टीव्ही पाहणार?, किती बातम्या ऐकणार, कुटुंबासोबत किती गप्पा मारणार? म्हणून मी थोडे पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडलो. इतक्यात माझ्या आईने मला थांबवले. ती माझ्यावर ओरडायला लागली. रागावलेली आई पाहून मी घाबरलो आणि शांतपणे घरात जाऊन बसलो. असे म्हणत जॉनीने गंमतीशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला.

जॉनी लिव्हर बॉलिवूडमधील विनोदाचे बेताज बादशाह म्हणून ओळखले जात होतेत. त्यांचा रुपेरी पडद्यावरील विनोद पाहून लोक खळखळून हसायचे. मात्र गेल्या काही काळात ते चित्रपटांपासून काहीसे दूर आहेत. तसेच सोशल मीडियावरही ते फारसे सक्रिय नसतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर आईचे ऐका आणि घरातच राहा असाही सल्ला त्यांना दिला आहे.

You might also like