Johnson Charles | वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने वेगवान शतक झळकावत ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन : काल दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात दुसरा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात धावांचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कालच्या सामन्यात दोन्ही संघाकडून चौकार – षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 7 चेंडू राखून सहज जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने (Johnson Charles) वेगवान शतक झळकावत इतिहास रचला आहे. तो (Johnson Charles) आता वेस्ट इंडिजकडून सर्वात वेगवान टी-20 शतक करणारा फलंदाज ठरला आहे. याअगोदर हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर होता.

जॉन्सन चार्ल्सने (Johnson Charles) कालच्या आपल्या खेळीत 39 चेंडूत शतक झळकावलं. तसेच त्याने काइल मेयर्ससोबत (Kyle Meyers) दुसऱ्या गड्यासाठी 135 धावांची भागिदारी केली. त्याने कालच्या सामन्यात आपल्या खेळीत 46 चेंडूत 118 धावा केल्या. या अगोदर ख्रिस गेलने वेस्ट इंडिजकडून 47 चेंडूत शतक झळकावले होते. जॉन्सन चार्ल्स आता टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणाऱ्या क्रिकेटर्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या अगोदर डेव्हिड मिलर (David Miller), रोहित शर्मा (Rohit Sharma) , एस विक्रमसेकरा (S. Wickramasekara) यांचा नंबर लागतो. या तिन्ही खेळाडूंनी टी 20 क्रिकेटमध्ये 35 चेंडूत शतक केले आहे.

जॉन्सन चार्ल्सची कारकीर्द
जॉन्सन चार्ल्स हा वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज आहे.
त्याने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला टी 20 सामना खेलळा होता.
त्याची क्रिकेटमधील कारकीर्द दहा वर्षांपेक्षा जास्त आहे.
मात्र तरीदेखील त्याला जास्त टी 20 सामने खेळता नाही आले.
त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 40 टी 20 सामने खेळले आहेत.
यामध्ये त्याने 130 च्या स्ट्राइक रेटने 950 धावा केल्या आहेत.
या खेळीमध्ये त्याने 100 पेक्षा जास्त चौकार आणि 40 हून अधिक षटकार मारले आहेत.

Web Title : Johnson Charles | wi vs rsa t20 johnson charles created history by hitting century in 39 balls

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dnyanoba Tukaram Award | सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, स्वामी श्री गोविंददेव गिरी, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्रदान

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण