जॉन्सन अँड जॉन्सन बेबीच्या ‘या’ प्रोडक्टवर देशभरात बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लहान मुलांसाठी सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनच बेबीच्या शाम्पूवर देशभरात बंदी आणली आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने यासंदर्भात निर्देश दिले असून, दुकानांमधून आणि गोदामांमधून पावडर आणि शाम्पूचा साठा हटवण्यासही निर्देश दिले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टवर अनेक आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे, जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टमध्ये कँसरयुक्त पदार्थ असल्याचे आरोपही झाले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टमध्ये एस्बेस्टस असतं ज्यामळे कँसर सारखा आजार होऊ शकतो अशी तक्रार अनेकदा देण्यात आली आहे.

परदेशात अनेक ठिकाणी यावर कारवाई देखील झाली आहे. याचदरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सनच्या उत्पादनांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. या चाचणीमध्ये त्यात गुणवत्ता नसल्याचे समोर आले. त्यामुळे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने जॉन्सन अँड जॉन्सन बेबीच्या शाम्पूवर देशभरात बंदी घालण्यात आली. इतकेच नव्हे तर, गुणांमध्ये आणि गोदामांमध्ये असलेला जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडर आणि शाम्पूचा साठा हटवण्यात यावा असे निर्देशही दिले आहेत.

विशेष म्हणजे, जॉन्सन अँड जॉन्सन बेबीचे नमुने आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम या राज्यातून गोळा करण्यात आले होते.