अमेरिकन कंपनीकडून ‘कोरोना’ची लस अंतिम टप्प्यात, ट्रम्प यांचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहे. अमेरिका, भारत, ब्राझीलला विषाणूचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सला कोरोनावरील लस विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून ज्या स्वयंसेवकाला कोरोनावरील लस देण्यात आली होती, ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ते अमेरिकेतील चौथे स्वयंसेवक आहेत जे वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. अमेरिकेतील अन्य नागरिकांना पुढे येऊन या चाचणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता जगभरात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी विरोधी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांच्यावरही हल्लाबोल केला. अमेरिकेत्या इतिहासात आर्थिक सुधारणांना सर्वात वेगाने आम्ही पुढे नेल्या आहेत. आमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. परंतु बिडेन हे विज्ञान विरोधी दृष्टीकोन असलेलेल व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like