पहिल्यांदा ‘TikTok’ व्हिडीओ बनवताना मुलीशी भांडताना दिसला जॉनी लिवर (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कॉमेडी किंग जॉनी लिवर आणि अभिनेता गोविंदा यांची जुगलबंदी चाहत्यांना खपू आवडायची. चाहत्यांनाही वाटतं की, जॉनी आधीप्रमाणे पुन्हा एकदा प्रमुख भूमिकांमध्ये दिसावा. अलीकडेच एका व्हिडीओमुळे जॉनी चर्चेत आला आहे. या व्हिडीओत जॉनी त्याची मुलगी जेमी लिवर सोबत पहिल्यांदाच टिकटॉक व्हिडीओ बनवताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. मजेदार पद्धतीनं सिनेमाच्या डालॉगवर अ‍ॅक्टींग करणारे बापलेक भांडताना दिसत आहे.

जॉनी लिवर त्याचाच एक सिनेमा आवार पागल दीवाना या सिनेमातील डॉयलॉगवर अ‍ॅक्टींग करत आहे. त्याची मुलगी जेमी जॉनीचे डायलॉग बोलत आहे तर जॉनी लिवर अभिनेता परेश रावलचे डायलॉग बोलत आहे. मजेदार पद्धतीनं दोघं भांडत आहे. जॉनी आणि जेमी लिवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

जेमीनं तिच्या ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर अभिनेता परेश रावलनंही कमेंट केली आहे. परेशनं म्हटलं आहे की, “धन्यवाद जॉनी भाई. तू नेहमीच माझा आवडता राहिला आहेस. मी ज्यांना ओळखतो त्यापैकी एक चांगला माणूस आहे तू.”