‘तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन करून अगदी .. पण होऊ शकता, अट एकच…’; कमेंट्सवर भडकल्या अमृता फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या समाज माध्यमावर अधिक अक्टिव्ह असतात. त्या अनेक राजकारणावर सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. त्यांच्या संगीतामुळे नेटिझन्स अधिक ट्रोल करत असतात. याकडे त्या सहज लक्ष देत नाहीत. परंतु आता एका यूजरने केलेल्या एका पोस्टवरून अमृता फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संतापून त्यांनी त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसात धाव घेतली आहे.

अमृता फडणवीस या एक बँकर आहेत. त्या अ‍ॅक्सिस बँकेत कार्यरत आहेत. तर एका युजरने अमृता फडणवीस यांच्या नोकरीवरून त्यांचा फोटो टाकून प्रतिक्रिया दिलीय, त्यावरून अमृता फडणवीस यांनी उत्तर दिल आहे. त्या कॉमेन्टरवरून अमृता फडणवीस यांनी त्या युजरला चांगलंच झाडलं आहे. तर, हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा आहे. एका स्वावलंबी स्त्रीला जिने अनेक वर्ष निष्ठेने काम केले आहे. तिची पुरुषाशी तुलना करून बदनाम केलं जात आहे. हे केवळ एक ट्विट नाही तर असे अनेक ट्विट पोस्ट केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त तुम्ही दबावाखाली न येता कारवाई कराल अशी अपेक्षा आहे असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय आहे यूजरचे कंमेंट?
मित्रांनो, अ‍ॅक्सिस बँकेत चांगलाच स्कोप आहे. तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन करून मॅनेजर अगदी VP पण होऊ शकता. अट एकच..असं पोस्ट करत अमृता फडणवीसांचा फोटो देखील टाकला आहे. तर महाविकास आघाडी समर्थक असं ट्विटर प्रोफाईलमध्ये लिहिलेल्या संतोष शिंदे यांनी ही पोस्ट केली. त्याला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला. त्यावर मित्रांनो, गुणवत्ता असेल तर अँक्सिस बँकेत तुम्ही वरच्या पदापर्यंत पोहचू शकता… इतकंच लिहिलं आहे, यातून त्यांनी असा वाकडा अर्थ का घेतला मला समजत नाही, आणि मी थोड कामात व्यस्त असल्याने तुमच्या DM, reply किंवा फोन कॉल्स ना उत्तर देऊ शकत नाही, नंतर रिप्लाय करेन, असं उत्तर संतोष शिंदेंनी यामध्ये दिलं आहे.