अमेरिका, अफगाणिस्तान यांच्या संयुक्त दहशतवादविरोधी हल्ल्यात ९० तालिबानी ठार तर २० जखमी

पक्तीका (अफगाणिस्तान ) : वृत्तसंस्था – अमेरिका आणि अफगाणिस्तान याच्या संयुक्त सेनेकडून दहशतवादाविरोधात केल्या गेलेल्या हल्ल्यात तब्बल ९० तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच २० दहशतवादी जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दक्षिण-पूर्वेकडील पक्तीका प्रांतात घडली आहे.

अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी अमेरिकेच्या हवाई दलाच्या मदतीने वर्मामा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती 203 व्या थंडर कॉप्स कडून खामा प्रेसला सांगितली गेली. तसेच अफगान नॅशनल आर्मी कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले की, सुरक्षा दलांनी या कारवाई दरम्यान कमीत कमी 90 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

येथील कारवाईत किमान 20 जण जखमी झाले आहेत. सोबतच 203 व्या थंडर कॉप्स कडून सांगितले गेले की, सुरक्षा दलांकडून 23 मोटार सायकली, ट्रॅक्टर तसेच काही शस्त्रास्त्रे नष्ट केले आहेत. या हल्ल्यात तालिबानी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर मारले गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच दहशतवाद्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like