Joint Pain In Winters | सांधे जखडले असतील तर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 फूड, हिवाळ्यात होते जास्त नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Joint Pain In Winters | हाडांमध्ये वेदना किंवा सांधे जखडण्याची समस्या असलेल्या लोकांसाठी हिवाळ्याचा हंगाम आणखी त्रास वाढवणारा असतो. हेल्थ एक्सपर्टनुसार, थंडीच्या हंगामात सांध्याची मालिश आणि रेग्युलर एक्सरसाईज वेदनांमध्ये दिलासा देण्याचे काम करते. यासाठी डेली डाएट किंवा खाण्या-पिण्याशी संबंधीत वस्तूंवर सुद्धा लक्ष दिले पाहिजे. सांधेदुखी आणि हाडे जखडली असतील तर काही गोष्टी टाळल्या (Joint Pain In Winters) पाहिजेत, त्या कोणत्या ते जाणून घेवूयात…

 

1. मीठ – Salt
आर्थरायटिस फाऊंडेशननुसार, जेवणात मीठाची मात्रा कमी किंवा योग्य प्रमाणात असेल तर शरीरात कॅल्शियमचा घसरणारा स्तर सावरता येऊ शकतो. यामुळे ऑस्टियोपोरोसिस (हाडांशी संबंधीत आजार) आणि फ्रॅक्चरची जोखीम सुद्धा कमी होते. मीठ शरीरात फ्लूड रिटेंशनचे निमित्त ठरते, ज्यामुळे सांध्यांना सूज आणि वेदनांची समस्या वाढते.

 

2. साखर – Sugar
बेकरी आयटम्स, कोला, मिठाई, आर्टिफिशियल ज्यूस, ब्रेड तसेच रिफायनरी प्रॉडक्ट टाळले पाहिजेत. शरीरात ब्लड ग्लूकोजची लेव्हल वाढल्याने आर्थरायटिसच्या रूणांचा त्रास वाढू शकतो. अशा गोष्टी टिशूज इन्फ्लेमेशन आणि सांधेदुखी वाढवतात.

3. रेड मीट – Red Meat
मेंढा-बकरीच्या मांसात भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड आढळते. सध्या दोन्ही गोष्टींचा शरीरात इम्फ्लेमेशनसोबत थेट संबंध असतो. हे सेवन केल्याने सांधे जखडतात आणि वेदनासुद्धा वाढतात. (Joint Pain In Winters)

 

4. ग्लूटन – Gluten
मोहरी, गहू आणि जव ग्लूटनचा चांगला स्त्रोत मानला जातो.
जर एखाद्या व्यक्तीला ग्लूटनची अ‍ॅलर्जी असेल तर त्याने या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
ग्लूटन शरीरात इन्फ्लेमेशनची समस्या वाढवते. हिवाळ्यात सांधेदुखी असेल तर ग्लूटन डाएट ताबडतोब बंद करा.

 

5. अल्कोहोल – Alcohol
आर्थरायटिसच्या रूग्णांसाठी अल्कोहोल मोठी समस्या निर्माण करू शकते.
278 लोकांवर झालेल्या संशोधनात आढळले की, अल्कोहोलचे सेवन आपल्या स्पायनल स्ट्रक्चरला डॅमेज करते.
अल्कोहोलपासून ऑस्टियोआर्थरायटिसची जोखीमसुद्धा वाढते.

 

Web Title :- Joint Pain In Winters | joint pain in winters 5 foods you should avoid if you have stiff joints

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

 

T20 World Cup 2022 Schedule | पुढील T-20 वर्ल्ड कपच्या तारखा झाल्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या संघाना मिळाली थेट ‘एंट्री’

MP Amol Kolhe | ‘ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये’ – अमोल कोल्हे

Rajkumar Rao | राजकुमार रावच्या विवाहसोहळ्यात जाऊन ‘या’ बड्या नेत्याने दिल्या जोडप्याला शुभेच्छा !