Joint Pain In Youngsters | सांधेदुखीने ग्रस्त होत आहेत तरूण, येथे जाणून घ्या कारणे आणि बचावाची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सांधेदुखी (Joint Pain) ही आजवर वृद्धापकाळातील समस्या मानली जात होती. मात्र गेल्या दहा वर्षांत ही समस्या तरुणाईला (Joint Pain In Youngsters) सुद्धा होऊ लागली आहे. 30 ते 35 वयोगटातील लोक या आजाराला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. मात्र, ही समस्या लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्येही (Joint Pain In Youngsters) दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली (Unhealthy Lifestyle).

 

मोठे दिवसभर लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर बसून काम करतात, तर मुले इनडोअर गेम्स (Indoor Games) खेळून आणि फास्ट फूड (Fast Food) खाऊन मोठी होत आहेत. त्यामुळे बालवयातच त्यांचे स्नायू कमकुवत (Weak Muscle) होत आहेत. यामुळे ते लवकरच संधिवात (Arthritis) म्हणजेच अर्थरायटिसच्या विळख्यात येतात. लहान मुलांमधील सांधेदुखीला किशोर अर्थरायटिस असे म्हणतात.

 

वृद्ध, तरुण किंवा लहान मुलांमध्ये अर्थरायटिस साठी जबाबदार घटक (How arthritis can affect young adults)

स्नायू कमकुवत होणे

शरीरात कॅल्शियमची कमतरता (Calcium Deficiency)

दुखापतीमुळे वेदना (Pain)

खुप जास्त लठ्ठपणा (Obesity)

ऑटोइम्युन डिसऑर्डर (Autoimmune Disorder)

अनुवांशिक कारणांमुळे (Genetic Cause)

 

शरीरात अर्थरायटिस कसा होतो (How does Arthritis Develop in the Body)?

जेव्हा स्नायू कमकुवत झाल्याने किंवा शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्याने आणि हाडांच्या सांध्यामध्ये यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) जमा होते तेव्हा सूज येते. त्यामुळे सांध्यातील ऊती नष्ट होऊ लागतात, त्यामुळे सांधे आखडतात आणि वेदना होतात. या दुखण्याला अर्थरायटिसच्या वेदना म्हणतात. (Joint Pain In Youngsters)

अर्थरायटिस कसा ओळखावा (Arthritis Symptoms)?

या आजारात शरीराच्या सांध्यांमध्ये वेदना होतात.

हिवाळ्यात हा त्रास वाढतो. कधी कधी इतके दुखते की हालचाल करतानाही त्रास होतो.

पायर्‍या चढताना किंवा उतरताना त्रास होतो. सकाळी आणि संध्याकाळी जास्त त्रास होतो. शरीरात थकवा जाणवतो.

 

अर्थरायटिसच्या वेदना कशा टाळाव्यात (How to Prevent Arthritis Pain)

ज्या कारणांमुळे हा त्रास होतो, त्यावर उपचार करणे आवश्यक आहे, जे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करणे योग्य आहे. हा त्रास टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत जेणेकरुन तुम्ही हिवाळ्यात या त्रासापासून दूर राहू शकाल (Home Remedies For Arthritis).

 

शरीर उबदार ठेवा (Keeps Body Warm), यासाठी योग्य प्रकारे उबदार कपडे घाला

खूप थंड पाण्यात हात घालू नका आणि थंड पाण्यात काम करणे टाळा (Working in a Cold Environment). खूप थंड पाणी तुमच्या वेदना वाढवू शकते.

थंड हवा वाहत असताना घराबाहेर पडू नका. जास्त वेळ थंड हवेत राहिल्याने वेदना होतात.

पिण्यासाठी कोमट पाणी (Drink Warm water) वापरा, यामुळे शरीरात आखडण्याची समस्या उद्भवणार नाही.

दिवसा उन्हात बसून अंगाला तेलाची मालिश करा.

योगा (Yoga) आणि ध्यान (Meditation) करा. त्यामुळे शारीरिक (Physical Strength) आणि मानसिक शक्ती (Mental Strength) मिळते.

अन्नामध्ये अशा गोष्टींचे सेवन करा, ज्यामध्ये कॅल्शियम (Calcium), व्हिटॅमिन-बी12 (Vitamin-B12) आणि व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) भरपूर प्रमाणात असेल.

तुमच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Joint Pain In Youngsters | why youngster are suffering with joint pain know the cause and treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | होळीच्या अगोदर कर्मचार्‍यांना मिळू शकते भेट, PF वर मिळेल जास्त व्याज – 12 मार्चला होणार निर्णय

 

Pune Crime | पुण्यात चोर पोलिसात थरार ! ATM फोडणार्‍या चोरट्यांकडून पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; हडपसरमधील पहाटेची घटना

 

Pune Crime | प्रकल्पाच्या आराखड्यात परस्पर बदल करून फसवणूक ! अशोक भंडारी, राजन रायसोनी, सिध्दांत कोठारी, अमान उर्फ अरमान कोठारीसह 6 जणांविरूध्द 1.45 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल