जॉनी लिव्हरची मुलगी जेमीचा ‘बोल्ड’ अंदाज चाहत्यांसमोर, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिध्द कॉमेडियन जॉनी लीव्हर यांची मुलगी आणि स्टँड-अप कॉमेडियन जेमी लिव्हरने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर नुकतेच काही ‘बोल्ड’ आणि ‘हॉट’ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून तिचा हटके लुक चाहत्यांसमोर आला आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत.

Advt.

पुर्वी जेमी लंडन येथील एका कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात काम करत होती. जॉनी लिव्हर हे लंडनच्या दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जेमीला एक स्टँड-अप कॉमेडियन म्हणून संधी दिली होती. एका मुलाखतीत जेमी म्हणाली की, माझा जन्म मुंबईत झाला, पण माझ्यातील विनोद कलाकाराने लंडनमध्ये जन्म घेतला. वडिलांनी संधी दिल्यानंतर जेमीमध्ये विनोदी कलाकार होण्याची इच्छा जागृत झाली आहे. अलिकडील काळामध्ये जेमी ही तिच्या वडिलांकडून अभिनयाचे धडे घेत आहे. मेगा स्टारर फिल्म ‘हाऊसफुल 4’ मधुन जेमी तिच्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘हाऊसफुल 4’ ची स्टारकास्ट तगडी असुन त्यामध्ये अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे आणि इतरांचा समावेश आहे.