जॉन्टी रोड्सनं वर्ल्डमधील ‘बेस्ट’ फिल्डर्सचा केला खुलासा, ‘या’ 2 भारतीयांना यादीमध्ये स्थान

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वामध्ये जोंटी रोड्स हा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता. त्याचप्रमाणे एक चांगला फलंदाज म्हणून देखील त्यांची ओळख होती. नुकतेच त्यांना जगातील बेस्ट फिल्डर बाबत विचारले असता त्यांनी याबाबत भाष्य केले. तसेच सांगितलेल्या यादीमध्ये दोन भारतीय खेळाडूंच्या नावाचा देखील उल्लेख केला.

जोंटी रोड्स यांना ट्विटरवर टॅग करत एका भारतीयाने प्रश्न विचारला आहे की, तुमच्या मते बेस्ट फिल्डर कोणता आहे ? याचे उत्तर देताना रोड्सने अनेक खेळाडूंची नावे घेतली जॅमध्ये हर्शल गिब्स, रिकी पांटिंग ए बी डीविलियर्स, सुरेश रैना, मार्टिन गुप्टिल, किरोन पोलार्ड आणि रविंद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश होता.

रोड्स येत्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी भारतात येत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने रोड्स यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नेमले आहे. याआधी तो मुंबई इंडियन्सबरोबर 9 वर्षे होता.

रोड्स यांनी फलंदाजीमध्ये देखील उत्तम कामगीरी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी 8 हजार धावा बनवल्या आहेत. रोड्स ने 52 कसोटी सामन्यांमध्ये 2532 रन बनवले आहेत आणि यावेळी त्यांचा सर्वोत्तम स्कोर 117 हा होता. कसोटीमध्ये त्यांनी 17 अर्धशतक आणि 3 शतक ठोकलेले आहेत. त्यातच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 5935 रण बनवलेले आहेत.