जोशी, गोंधळी, वासुदेव समाजाने एकत्र यावे : रेणके

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जोशी, गोंधळी, वासुदेव या तिन्ही समाजाला जास्तीचे आरक्षण हवे आहे. याकरीता तिन्ही समाज बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन जोगोवा सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव रेणके यांनी केले. खासगांव येथे जोगोवा सेवा समितीच्या शाखा नामफलकाचे उदघाटन व समितीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आसाराम बोटुळे यांची उपस्थिती होती.

रेणके म्हणाले, प्रत्येक समाजाला आरक्षण आहे. माञ आजही आपल्या समाजाला अडीच टक्केच आरक्षण असून त्या मध्येही ५२ जातीचा समावेश केलेला आहे. नुकतेच मराठा समाजाला शासनाने १६ टक्के आरक्षण दिले आहे. जोशी, गोंधळी,वासुदेव समाजाला जास्तीच आरक्षण मिळाल पाहिजेत. त्याकरिता तिन्ही समाज बांधवांनी एकञ येण्याची गरज आहे असे सांगून जोशी, गोंधळी, वासुदेव, या तीन ही समाजाचे कुलदैवत तुळजाभवानी हे एकच असल्याने जाती-जातीमध्ये विभाजन करु नये असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ.श्यामसुंदर सोनवणे, तातेराव शिंदे, भारत दादा शिंदे, अंबादासराव काळे, केशवराव मोहरकर, एल. बी.चव्हाण, श्रीकृष्ण बोटुळे, हरिभाऊ गवळी, अंकुशराव धुर्वे, संजय कानडे, विजय साळवे, राजेंद्र साळवे, प्रा. नंदकिशोर लेखणार, श्रीकांत बुटळे, गजानन यदमाळ, गणेश आहेर, गजानन कानडे, प्रविण कानडे, रमेश जोशी व समाज बांधव उपस्थित होते.

आदिवासी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नवीन धोरणाची आवश्यकता : सुखदेव थोरात