Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! जोशी स्पोर्ट्स, एलके इलेव्हन संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत जोशी स्पोर्ट्स संघ आणि एलके इलेव्हन या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्धघाटनाचा दिवस गाजवला. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत शाम यादव याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर जोशी स्पोर्ट्स संघाने विकेंड वॉरीयर्स संघाचा ७३ धावांनी पराभव करून स्पर्धेचा उद्धघाटनाचा दिवस गाजवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जोशी स्पोर्ट्स संघाने १८ षटकात १८२ धावांचे आव्हान उभे केले. हेमंत वाईकर (३९ धावा), विवेक चांडेल (३१ धावा), कुणाल चौहान (३१ धावा), निलेश माळी (२४ धावा) आणि शाम यादव (२६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना विकेंड वॉरीयर्स इलेव्हनचा डाव १०९ धावांवर मर्यादित राहीला. शाम यादव याने २१ धावात ४ गडी बाद करून विकेंड वॉरीयर्सच्या डावाला खिंडार पाडले व विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसर्‍या सामन्यात सुयश भट याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने स्पार्टन्स् क्रिकेट क्लबचा ११ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. एलके इलेव्हन संघाने गिरीष कोंडे (४१ धावा), सुयश भट (नाबाद ४० धावा) आणि गणेश जोशी (नाबाद ४२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १९६ धावा धावफलकावर लावल्या. याला उत्तर देताना स्पार्टन्स् क्रिकेट क्लबचा डाव १८५ धावांवर मर्यादित राहीला. स्पार्टन्स्च्या नचिकेत कुलकर्णी याने ९४ धावांची खेळी एकहाती लढा दिला. पण त्याची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

जोशी स्पोर्ट्सः १८ षटकात ७ गडी बाद १८२ धावा (हेमंत वाईकर ३९, विवेक चांडेल ३१, कुणाल चौहान ३१, निलेश माळी २४, शाम यादव २६, रोहीत हांडे ३-२५, चिन्मय देशमुख २-२०) वि.वि. विकेंड वॉरीयर्स इलेव्हनः १८ षटकात ८ गडी बाद १०९ धावा (चिन्मय बिडकर २६, शिवराज शिंदे १९, शाम यादव ४-२१, कुणाल चौहान २-१६); सामनावीरः शाम यादव;

एलके इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद १९६ धावा (गिरीष कोंडे ४१, सुयश भट नाबाद ४०,
गणेश जोशी नाबाद ४२, कृष्णा भट २-३५) वि.वि. स्पार्टन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ५
गडी बाद १८५ धावा (नचिकेत कुलकर्णी ९४ (६२, ११ चौकार, ४ षटकार), विवेक कुबेर
२४, सुयश भट १-२७); सामनावीरः सुयश भट;

Web Title :  Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi
Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament! Joshi Sports, LK XI teams graced the opening day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Blood Donation Camp In Pune | शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबीरात 125 जणांचे रक्तदान