Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; कल्याण इलेव्हन संघाचा सलग दुसरा विजय; ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबची विजयी सलामी !!

पुणे, २९ मार्चः जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket) कल्याण इलेव्हन संघाने (Kalyan XI Team) सलग दुसरा तर, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने (Global Warriors Cricket Club) विजयी सलामी दिली. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर (Vision Cricket Academy Ground) सुरू असलेल्या या स्पर्धेत गौरव गोलहार याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने जोशी स्पोर्ट्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने २०८ धावांचे आव्हान उभे केले. मोहम्मद ताहीर (३८ धावा), सक्षम साकरे (३७ धावा), प्रिन्स् अरोरा (३३ धावा) आणि ऋतुराज वीरकर (३० धावा) यांनी धावांचे योगदान दिले व संघाला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. या आव्हाना समोर जोशी स्पोर्ट्सचा डाव १७४ धावांवर मर्यादिर राहीला. हेमंत वाईकर याने ६३ धावांची खेळी केली. गौरव गोलहार याने २४ धावात २ गडी तर, उत्कर्ष चौधरी (२-२४) याने अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

चिराग शेरकर याच्या नाबाद ७८ धावांच्या खेळीमुळे कल्याण संघाने वीकेंड वॉरीयर्सचा २४ धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना कल्याण इलेव्हन संघाने १६० धावांचे आव्हान उभे केले. चिराग शेरकर याने ४७ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वीकेंड वॉरीयर्सचा डाव १३६ धावांवर मर्यादित राहीला. गोलंदाजीमध्ये चिराग शेरकर याने १५ धावात ४ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद २०८ धावा (मोहम्मद ताहीर ३८, सक्षम साकरे ३७,
प्रिन्स् अरोरा ३३, ऋतुराज वीरकर ३०, विकास सहानी ३-३४, आशितोष जाधव २-३८)
वि.वि. जोशी स्पोर्ट्सः २० षटकात ६ गडी बाद १७४ धावा (हेमंत वाईकर ६३ (४३, ७ चौकार, २ षटकार),
निलेश माळी ३६, श्रेयस काकडे २६, गौरव गोलहार २-२४, उत्कर्ष चौधरी २-२४); सामनावीरः गौरव गोलहार;

Advt.

कल्याण इलेव्हन संघः २० षटकात ८ गडी बाद १६० धावा (चिराग शेरकर नाबाद ७८ (४७, ७ चौकार, ३ षटकार),
मेहूल एस. २५, पुनित ओस्वाल २०, पुष्कर कुयाते ४-२३) वि.वि. वीकेंड वॉरीयर्सः २० षटकात ९ गडी बाद १३६
धावा (संकेत सरोदे २१, शुभम कोठारी नाबाद २१, चिराग शेरकर ४-१५); सामनावीरः चिराग शेरकर;

Web Title :-  Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament; Kalyan XI’s second win in a row; Victory Salute of Global Warriors Cricket Club !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Pune BJP MP Girish Bapat | आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं, आमचा मार्गदर्शक हरपला – चंद्रकांत पाटील

NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल

Beed Crime News | माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल