Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; अयोध्या वॉरीयर्स, कल्याण इलेव्हन संघांची विजयी सलामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत अयोध्या वॉरीयर्स आणि कल्याण इलेव्हन या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हृषीकेश बडवे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अयोध्या वॉरीयर्स संघाने आयडिआज्-अ-सास् संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आयडिआज् संघाचा डाव ११३ धावांवर मर्यादित राहीला. सनी मॅट्टु (२४ धावा) आणि निलेश चव्हाण (नाबाद १९ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. अयोध्या संघाच्या हृषीकेश बडवे याने ११ धावात ४ गडी बाद केले. सिद्धार्थ वैद्य (३-२२) याने दुसर्‍या बाजूने अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान अयोध्या वॉरीयर्स संघाने १२.४ षटकात पूर्ण केले. यश तुंगे याने नाबाद ६५ धावांची तर, शंतनु गांधी याने नाबाद ३१ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

केतन पासलकर याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कल्याण इलेव्हन संघाने जोशी स्पोर्ट्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. जोशी स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजी करताना १०३ धावांची मजल मारता आली. जसवंत माळी याने नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाला शतकी धावसंख्या गाठण्यास मदत केली. कल्याण संघाच्या केतन पासलकर याने १६ धावात ४ गडी बाद करून जोशी संघाच्या डावाला खिंडार पाडले. चिराग शेरकर (३-१३) यानेही दुसर्‍या बाजूने अचूक गोलंदाजी केली. कल्याण इलेव्हन संघाने १२.२ षटकात व ५ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. रोहीत गुगळे (४२ धावा) आणि केतन परमार (२२ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

आयडिआज्ः १८.२ षटकात १० गडी बाद ११३ धावा (सनी मॅट्टु २४, निलेश चव्हाण नाबाद १९, हृषीकेश बडवे ४-११, सिद्धार्थ वैद्य ३-२२) पराभूत वि. अयोध्या वॉरीयर्सः १२.४ षटकात ३ गडी बाद ११६ धावा (यश तुंगे नाबाद ६५ (३१, १० चौकार, २ षटकार), शंतनु गांधी नाबाद ३१, नृपाल सवे ३-१७); सामनावीरः हृषीकेश बडवे;

जोशी स्पोर्ट्सः २० षटकात ९ गडी बाद १०३ धावा (जसवंत माळी नाबाद ४२, शिवम सॉ १७,
केतन पासलकर ४-१६, चिराग शेरकर ३-१३) पराभूत वि. कल्याण इलेव्हनः १२.२ षटकात ५
गडी बाद १०५ धावा (रोहीत गुगळे ४२, केतन परमार २२, विकास सहानी ३-७); सामनावीरः केतन पासलकर.

Web Title : Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi
Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament; Winning
opening of Ayodhya Warriors, Kalyan XI teams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Hadapsar News | हडपसरमध्ये गुढीपाडवा उत्सवानिमित्त अनेक सामाजिक संघटनांकडून शोभा यात्रा

Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला