‘राज ठाकरें’ विरोधात पोलिसात तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेच्या १३व्या वर्धापन दिनी आयोजित सभेत निवडणुकांच्या आधी किंवा निवडणुकांचे टप्पे सुरु असताना पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल या वक्तव्यचा विरोध म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

९ मार्च रोजी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३ वा वर्धापन दिन होता, दरम्यान मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, उपस्थितांना संबोधतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. त्यावेळी निवडणुकांच्या आधी किंवा निवडणुकांचे टप्पे सुरु असताना पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार एस बालकृष्णन यांनी बूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इतकेच नव्हे तर, राज ठाकरे हे एका पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यांची गांभीर्याने दाखल घेतली जातात. असे असूनही त्यांनी मोदींविरोधात भाष्य करताना पुलवामासारखा एखादा हल्ला पुन्हा घडवला जाईल असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य बेजबाबदार असून याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

संभाजी कदम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त

बँक ऑफ महाराष्ट्रवर फिल्मी स्टाईल दरोडा

ICC कडे भारतीय खेळाडूंची तक्रार करणारा पाकिस्तान तोंडावर आपटला

राहुल गांधींकडे हिंदू असल्याचा काही पुरावा आहे का ?

शरद पवारांच्या माघारीनंतर माढ्यात मोहिते पाटील की प्रभाकर देशमुख