Journalist Amol Kavitkar | भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर

पुणे : Journalist Amol Kavitkar | भारतीय जनता पार्टीच्या ‘पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख’पदी टिव्ही पत्रकारितेत गेली ११ वर्षे कार्यरत असलेले पत्रकार अमोल कविटकर (Journalist Amol Kavitkar) यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडीचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. प्रसंगी ‘महाविजय २०२४’ अभियानाचे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय (MLA Shrikant Bhartiya) , प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) उपस्थित होते.

कविटकर यांनी ‘एबीपी माझा’मध्ये मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘साम टिव्ही’मध्ये पुणे ब्युरोमध्ये काम केले आहे. दैनंदिन घटनांसह शहरीकरणाचे प्रश्न, ग्रामीण समस्या आणि शेती प्रश्नांच्या वार्तांकनाचा अनुभव आहे. शिवाय सांगली आणि चिपळूणच्या महापुराचे त्यांनी केलेले वार्तांकन चर्चेचा विषय ठरले होते.

‘आपला प्रसार माध्यमांशी असलेला संपर्क पक्ष संघटनेतील माध्यम विभागाच्या कामास गती देण्यास
निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास असून ही जबाबदारी पार पाडताना माध्यम विभागातील सर्वांना सोबत
घेऊन भाजपाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम कराल’,
अशी अपेक्षा व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कविटकर यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title :-  Journalist Amol Kavitkar | Amol Kavitkar as ‘West Maharashtra Media Chief’ of BJP

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar Resigns | शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीनं फेटाळला, पुढं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष (Video)

Pune Cyber Crime News | अमेरिकेतील बहिण अडचणीत असल्याचे समजून त्याने पाठविले पैसे; सायबर चोरट्यांनी घातला दीड लाखांना गंडा