पुण्यातील चोरीची दुचाकी सापडली ‘त्या’ पत्रकाराकडे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे व शिरपूर येथून चोरी झालेल्या दुचाकींसह खासगी वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पत्रकारासह त्याच्या एका साथिदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि.२६) करण्यात आली. दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b3599c5-a9ef-11e8-a09f-6ffcefccfa36′]

पत्रकार योगेश मुरलीधर बैरागी (वय २९, रा.पंकज नगर थांबा, चोपडा) व मनोज शालिक सोनवणे (वय ३०, रा.वाल्मीक नगर, चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
कोणी नगरसेवक शोधून देतयं का नगरसेवक 

चोपडा येथे एका पत्रकाराकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती कॉन्स्टेबल सूरज पाटील यांना मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी एक पथक चोपडा येथे पाठविले होते. योगेश बैरागी याला दुचाकीसह ताब्यात घेतले असता त्याने ही दुचाकी पुणे येथील मित्र सोनवणे याने दिली असल्याचे सांगितले. दरम्यान, जी दुचाकी बैरागीजवळ होती त्याबाबत पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दुसरी दुचाकी मनोज सोनवणे याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. ती दुचाकीही शिरपूर येथून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले व त्याबाबतही गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोघांना अटक केल्यानंतर शिरपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ