दुर्दवी ! कारच्या धडकेमुळे पत्रकाराचा मृत्यू, IAS अधिकाऱ्याला अटक

केरळ : वृत्तसंस्था – केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीला धडकल्याने एका स्थानिक वृत्तपत्रातील पत्रकाराचा मृत्यू झाला. यावेळी आयएएस अधिकारी श्रीराम वेंकटरमन नशेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वेंकटरमन यांना अटक करत पुढील कारवाई चालू केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वेक्षण निर्देशक या पदावर कार्यरत असणारे ३३ वर्षीय श्रीराम वेंकटरमन हे कार चालवत असताना ही दुर्घटना झाली असून ते यावेळी नशेच्या अंमलाखाली होते. त्यावेळी त्यांच्या महागड्या गाडीमध्ये त्यांची मॉडेल असणारी मैत्रीण वफा फिरोजा ही देखील त्यांच्याबरोबर होती. निष्कळजीपणे चालवल्या जाणाऱ्या या गाडीने म्यूजियम रोड वर उभ्या असलेल्या मोहम्मद बशीर (३५) या पत्रकाराच्या गाडीला धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून ते मल्याळी वृत्तपत्र ‘सिराज’ चे ब्यूरो प्रमुख होते.

गाडीची टक्कर इतकी जोरदार होती की, मोटरसाइकल आणि कार चे अनेक तुकडे रस्त्यावर पसरलेले सापडले तर बशीरचे साहित्य घटनास्थळाहून कित्येक मित्र लांब पडलेले सापडले. रस्त्यावर रक्ताचे मोठे डागदेखील पडले होते. पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या धारा २७९ (सार्वजनिक जागेवर निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि ३०४अ (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा) दाखल करण्यात आला आहे.

वेंकटरमन हे एक डॉक्टर असून त्यांनी परदेशात जाऊन अत्युच्च दर्जाचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ते आयएएस झाले असून नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने त्यांची नियुक्ती सर्वेक्षण निर्देशक या पदावर केली होती. अशा जबाबदार अधिकाऱ्याने नशेच्या धुंदीत असा गुन्हा केल्याप्रमाणे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त