अंबाजोगाई शिवसेना शहरप्रमुखपदी पत्रकार गजानन मुडेगावकर यांची नियुक्ती

अंबाजोगाई : पोलीसनामा आॅनलाईन – बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे शिवसेनेच्या शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, मतदारसंघ संघटक जिल्हा सह संघटक, तालुकासमन्वयक अशा पदांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात एकाच परिवारातील दोन दिग्गज नेत्यांचे म्हजेच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व जास्त असल्याने शिवसेनेला तेथे वर्चस्व प्राप्त करता आले नाही. तरी आगामी निवडणुकीत वर्चस्व प्राप्त करण्यासाठी पक्ष नव-नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतो. याच दरम्यान शिवसेनेने पत्रकार गजानन मुडेगावकर यांची अंबाजोगाई शहरप्रमुखपदी  नियुक्ती केली आहे. याचबरोबर  तालुकाप्रमुखपदी अर्जुन वाघमारे यांचा निवड करण्यात आली. केज अंबाजोगाई मतदारसंघ संघटक पदी प्रशांत आदनाक तर जिल्हा सह संघटक अशोक गाडवे यांची निवड करण्यात आली. तसेच तालुकासमन्वयक म्हणून बाळासाहेब शेप, जिल्हा सह संघटक म्हणून संतोष काळे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्त्या या  शिवसेना मुखपत्रातून जाहीर करण्यात आल्या.

“मला शहरप्रमुखपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आभार मानतो. इतकेच नाही तर चंद्रकांतजी खैरे, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,केज मतदार संपर्क प्रमुख अनिल विचारे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब अंबुरे आदीसह शिवसेना नेते व शिवसैनिकांचेही मीआभार व्यक्त करतो” असे गजानन मुडेगावकर यांनी म्हटले.