घरात भीषण आगीत जळून तरुण जागीच ठार; 90 % होरपळला एक पत्रकार

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथे पत्रकाराच्या घरात भीषण आगीत एका युवकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याचवेळी या घटनेत पत्रकार राकेश सिंह निर्भेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लखनऊमधील ट्रॉमा सेंटर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पत्रकार राकेश सिंह म्हणाले की, त्यांच्या घरात आग लावून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आग इतकी भयंकर होती की, घराचा एक भाग खराब झाला आणि भिंत कोसळून पडली. या दुर्घटनेत पत्रकार राकेशसिंह 90 टक्क्यांहून अधिक जळाले आहेत, तर घराच्या खराब झालेल्या भागामध्ये एका युवकाचा गंभीरपणे जळलेला मृतदेह सापडला आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेला पत्रकार राकेशसिंह निर्भिकचा मित्र पिंटू साहू यांचा मृतदेह असल्याचे व्यक्त केले जात आहे. पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्यात गुंतले आहेत. ही घटना कोतवाली ग्रामीण भागातील काळवारी गावची आहे.

शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पत्रकार राकेश सिंह यांच्या घरात भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीमुळे घराचा काही भाग खराब झाला. तोपर्यंत एका युवकाचा मृतदेह जळून खाक झाला होता. यात पत्रकार राकेश सिंह गंभीर जखमी झाले आहेत. जखमी राकेशसिंह यांना पोलिसांनी ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ट्रॉमा सेंटर येथे रेफर केले.

मास्क घातलेले व्यक्ती घरात घुसले, हल्ल्यानंतर आग लावली : राकेश सिंह

रुग्णालयात दाखल झालेल्या पत्रकार राकेश सिंह यांनी सांगितले की, एका व्यक्तीने त्याच्या घराला आग लावली. भयानक जळलेल्या पत्रकाराने सांगितले की, काही मास्क घातलेले लोक त्याच्या घरात घुसले आणि त्यांनी हल्ला केला; मग आग लावली. आगीत भिंत कोसळल्याने बेडरूम आणि किचनचा काही भाग खराब झाला आहे.

घटना कशा घडली याचा तपास केला जात आहे : सीओ सिटी

घटनेच्या वेळी पत्रकार राकेश सिंहची पत्नी आपल्या दोन मुलींसोबत माहेरी गेली होती. या भीषण अपघातात अनेक रहस्ये अद्याप उघडकीस आली नाहीत. पोलीस तपास करत आहेत, परंतु असे अनेक पुरावे सापडले आहेत जे एका गंभीर घटनेकडे निर्देश करतात. यावेळी उपस्थित सीओ सिटी राधा रमण सिंह म्हणाले की, पोलीस वस्तुस्थितीच्या आधारे तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमसुद्धा स्थापन करण्यात आली असून, ही घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.