पत्रकार तरुणीसह 10 जणांना UP पोलिसांकडून अटक, पदयात्रा काढल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील पत्रकार प्रदीपिका सारस्वत सहित 10 तरुणांना मंगळवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेत तुरुंगात धाडले. सूत्रांच्या मते हे लोक परवानगीशिवाय पदयात्रा करण्यास निघाले होते, यामुळे गाजीपूरमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी तरुण गोरखपूरच्या चौरीचौरापासून दिल्लीच्या राजघाटपर्यंत पदयात्रेसाठी निघाले होते. तरुणांचे म्हणणे आहे की ते समाजात सद्भाव वाढवू इच्छित आहेत त्यासाठी ते नागरिक सत्याग्रह पदयात्रा काढत आहेत.

पोलिसांनी तरुणांवर कलम 151 अंतर्गत कारवाई केली आहे, परंतु हे सांगण्यात आले नाही की त्यांच्या पदयात्रेने काय समस्या होती. प्रदीपिका यांनी 10 फेब्रुवारीला फेसबूकवर लिहिले होते की काल संध्याकाळपासून पोलीस पदयात्रेवर लक्ष ठेवून आहेत, फोटो घेत आहेत, व्हिडिओ शूट करत आहेत. राज्य इतके घाबरले आहे की चार लोकांना शांती आणि सौहार्दाने बोलताना त्यांना पाहावत नाही. ही पदयात्रा एक शाळा आहे, ज्यात पायी चालत आम्ही शिकत आहेत की एखादी जागा काश्मीर कसे बनते.

तुरुंगात पाठवण्यात आलेल्या लोकांमध्ये मनीष शर्मा, प्रियेश पांडे, नीरज राय, अनंत शुक्ल, मुरारी, राज अभिषेक, शेष नारायण ओझा यांचा समावेश आहे. मुरारी आणि प्रियेश बनारस हिंदू विश्वविद्यापीठाचे एमएचे विद्यार्थी आहेत. प्रदीपिका यांनी यात्रेबाबत सांगितले की मी एका लेखात सांगितले होते की, उत्तर प्रदेशात सीएए-एनआरसीच्या आंदोलनादरम्यान एकूण 23 लोकांचा मृत्यू झाला. या मुद्यावरुन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी फॅक्ट फाइंडिग टीम बनवली आहे. हिंसक घटनेबाबत माहिती केल्यानंतर तरुणांनी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदीपिकाच्या मते, तरुणांनी निश्चित केले होते की उत्तर प्रदेशात जातील, लोकांना भेटतील आणि त्यांना सांगतील की हिंदू-मुस्लिम असा विभाजित होणं टाळा. ही यात्रा गोरखपूरपासून 1 फेब्रुवारी 2020 ला सुरु झाली होती. तरुणांनी पायी यात्रेचे काही नियम निश्चित केले होते, या दिवसात कोणतेही विलासी जीवन जगायचे नाही फक्त शाकाहारी जेवायचे आणि जेथे जशी व्यवस्था असेल तसे तिथे राहायचे.