धक्कादायक ! ‘कोरोना’ संक्रमित पत्रकारानं केली आत्महत्या, AIIMS च्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये एका कोरोना बाधित व्यक्तीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा व्यक्ती पत्रकार होता. जखमी झालेल्या पत्रकाराला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारे तरुण सिसोदिया कोरोना संक्रमित होते. त्यांच्यावर एम्स कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. या अपघातानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर तरुण यांच्या कुटूंबियांना माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पण अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही. या प्रकरणी पुढे रुग्णालय आणि कुटूंबाची चौकशी केली जाईल.

तरुण यांच्याकडून कोणतेही आयकार्ड सापडलेले नाही, पण ते एका मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असल्याचे समजते. कोरोना काळात त्यांनी आपली नोकरी गमावली असल्याचे सांगितले जात आहे.

देशात ७ लाख कोरोना रुग्ण

देशात कोरोनाची प्रकरणे वाढतच आहेत. आता देशात कोरोना रूग्णांची संख्या सात लाखांच्या वर गेली आहे. जगातील सर्वाधिक कोरोना बाधित देशांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे.