दिवसाढवळ्या महिला पत्रकाराला लुटले ( व्हिडीओ )

नवी दिल्ली वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये दिवसाढवळ्या एका महिला पत्रकाराच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकीवरून आलेले चोर पसार झाले आहेत. ओखला परिसरातील एक घटना आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

महिला जेके 24X7 न्यूज मध्ये पत्रकार म्हणून काम करते. यामुळे पुन्हा एकदा दिल्लीच्या सुरेक्षेबाबतचा आणि प्रशासनाच्या कामाबाबदचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या आधीही दिल्लीच्या रस्त्यांवरती अशीच एक घटना घडली होती पत्रकार जॉयमाला यांच्यासोबत झालेल्या लुटमारीचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला नव्हता त्यावेळी पोलिसांनी चित्तरंजन पार्क आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पहिले होते. त्यानंतर याबाबत काही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

 

Visit : policenama.com