का टाकला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर पत्रकारांनी बहिष्कार

नाशिक:  पोलीसनामा ऑनलाईन

 

आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांसोबतच्या भेटीच्या कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. पण, स्थानिक पत्रकारांनी या कार्यक्रमात बहिष्कार टाकला आहे. पोलिसांनी केलेली अडवणूक व काही प्रतिनिधींशी केलेल्या अरेरावीमुळे पत्रकारांनी हा निर्णय घेतला आहे.
नाशिकमधील सह्याद्री फार्म हाउसवर फडणवीस यांच्या शेतकाऱ्यांसोबत भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी पत्रकारांना वार्तांकन करण्यास मनाई करण्यात आली होती. तसंच, इतर प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडिया प्रतिनिधींशी हुज्जत घातली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29103003-c3df-11e8-a51b-4fe5dbd94e12′]

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत पत्रकारांचे व्हिडिओ चित्रीकरणही केले होती. त्यामुळे पोलीस आणि पत्रकारांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी पत्रकाराशी प्रवेशद्वारावरच वादावादी करण्यात आली. आमदार आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करूनही पोलीस अधीक्षकांची अरेरावी कायम राहिली. त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

[amazon_link asins=’B07BHFT3VQ,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7a3eb20-c3e0-11e8-be0d-0f95f61fda69′]

जाहिरात

‘त्यांचा’ गांधीजींचा धडा हद्दपार करण्याचा घाट :  खासदार चव्हाण

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे देण्यासोबतच सशक्त भारत होण्यासाठी सामाजिक व व्यवहारीक जाण शिकवावी. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक व व्यवहारिक ज्ञानाचे धडे दयावेत.असे आव्हान अशोक चव्हाण यांनी केले.

पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आज ( दि २८ सप्टेंबर २०१८ बायपास रोडवरील ओमलॉंन्स भोकर येथे, तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर आ. अमिताताई चव्हाण, जि. प.आध्यक्षा शांताबाई पा.जवळगावकर , शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, पाटील, जि. प. सदस्य अनिल पाटील खानापुरकर, प्रकाश पाटील भोसीकर, बाळासाहेब पाटील रावनगावकर , दिवाकर रेड्डी, कृ.ऊ.बा समिती सभापती जगदिष पा. भोसीकर माजी महापौर किशोर स्वामी, पं.स. सभापती झिमाबाई चव्हाण, सुभाष पा.कोळगावकर, गणेश राठोड , गणपत जाधव, अदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. येथे स्वागताचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे ४८ प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा खासदार अशोक चव्हाण आणि आ. अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, आज देशात शैक्षणिक परिस्थिती बिकट होत चालली असून काही छुप्या शक्ती ह्या महात्मा गांधी यांचा धडा देखील पाठयपुस्तकातून हद्दपार करण्यासाठी घाट रचत आहेत म्हणून शिक्षकांनीच आता विदयार्थ्यांना भविष्यकाळ
कसा उभा करावा यासाठी चांगले काय ठरवून विदयार्थ्यांना शिकवावे पर्यायाने स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे असे आवाहन ही केले.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dddae140-c3e0-11e8-bcff-69cd82bc1783′]