पत्रकार निरव मोदीला शोधू शकतात तर सरकार का नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बँकांना १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिऱ्याचा व्यापारी निरव मोदीबाबत काँग्रेसने भाजप सरकारला जाब विचारला आहे. नीरव मोदी लंडनमध्ये असून एकदम ऐशो आरामात जगत आहे. नीरव मोदी लंडनच्या रस्‍त्‍यावर फिरताना दिसून आला आहे. पत्रकार निरव मोदीला शोधू शकतात तर सरकारला त्याला पकडणे अशक्य का आहे असा सवाल काँग्रेसने ट्विटरद्वारे विचारला आहे.

काँग्रेसच्या ट्विटरद्वारे म्हंटल आहे की ‘पत्रकार नीरव मोदीला पकडण्यात यशस्वी झाले. मात्र मोदी सरकारसाठी निरव मोदीला पकडणे का अशक्य ठरत आहे ? मोदी नक्की कुणाची रक्षा करत आहेत ?  स्वतःची, नीरव मोदीची, की त्याला पळण्यास मदत करणाऱ्या लोकांची ?

पंजाब नॅशनल बँकेचे १४ हजार कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला सरकार शोधत असताना, तो लंडनमधील वेस्ट एंड भागातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये ऐषोआरामात राहत आहे असे दिसून आले आहे. लंडनमधील ‘द टेलीग्राफ’ या वृत्तपत्राचा प्रतिनिधी मिक ब्राउन याने मोदीला शोधून काढले आहे.द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीने लंडनमध्ये हिऱ्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही टेलिग्राफने म्हटले आहे. नीरव मोदीचा व्हिडीओही यासोबत जारी करण्यात आला असून अत्यंत बिनधास्तपणे लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. नीरव मोदीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

ह्याहि बातम्या वाचा

”पुन्हा भाजपची सत्ता येईल, पण पंतप्रधान मोदीच होतील का शंकाच”

kareena aunty : त्यानं ‘आंटी’ म्हटल्यानं करिना संतापली

राज्यातील २ उप अधिक्षक / सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

‘टेलीग्राफचे पत्रकार नीरव मोदीला शोधू शकतात , परंतु चौकीदार नाही’…!